कापूस भाव 12,500 हजार होणारच..Ravikant Tupakar

कापूस भाव 12,500 हजार होणारच..Ravikant Tupakar

Ravikant Tupakar : सध्या कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी एक बातमी समोर येत असून या बातमीला ऐकून निश्चितच कापूस उत्पादक शेतकरी मित्रांना आनंद होणार आहे. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या म्हणण्यानुसार कापसाच्या बाजारभाव किमान 12,500 हजार रुपये जाऊ शकतो.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कापूस तसेच सोयाबीन पिकाचे बाजार भाव वाढण्यासाठी बीड जिल्ह्यात आंदोलन सुरू केले होते. बीड जिल्ह्यात सुरू झालेल्या आंदोलनात रविकांत तुपकर यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. परंतु सरकारने या उपोषणाकडे लक्ष न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारशी बोलणी करण्यासाठी थेट मुंबई गाठली.

हे पण वाचा : आजचे कापुस बाजार भाव; राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पहा काय भेटत आहे कापसाला दर New Cotton Price Today

मुंबई येथे रविकांत तुपकर यांनी सरकारशी बोलणी केली असता, सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविकांत तुपकर यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या; या मागण्यांवर विचार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा दिवसाचा टाईम घेतलेला असून 15 दिवसात योजनांवर निर्णय देऊ असे कळविण्यात आले.

रविकांत तुपकर यांच्या मागण्या काय आहेत ?

  1. सोयाबीन पिकाला 9 हजार रुपये हमीभाव मिळावा.
  2. कापूस पिकाला 12500 रुपये हमीभाव मिळावा.
  3. पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी.
  4. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळ निधी लवकरात लवकर द्यावा.

अशा विविध योजना रविकांत तुपकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी तसेच विचार विनिमय करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारतर्फे रविकांत तुपकर यांच्याकडून 15 दिवसाचा टाईम घेतलेला आहे.

त्याच अनुषंगाने जर सरकारने रविकांत तुपकर यांच्या मागण्या पूर्ण केल्या तर कापूस तसेच सोयाबीन पिकाचे बाजार भाव वाढणार आहेत. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयाकडे सर्व शेतकरी वर्गाचे लक्ष लागलेले आहे.

आजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारच्या विविध योजनांची माहिती येथे पहा

Leave a Comment

Close Visit krushibazarbhav