Kapus rate update 15 january 2024 : जानेवारी महिन्यात कापूस दरात होणार वाढ..! आवक होणार कमी

Kapus rate update 15 january 2024 :   सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकरी मित्रांनो जाणकारांच्या मते जानेवारी महिन्यामध्ये कापूस आवक कमी होऊन कापसाच्या दरात वाढ होण्याचे संकेत आहेत. यासंबंधी आपण या पोस्टमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपण अजून पर्यंत कापूस विकला नसेल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत कापूस बाजार भाव वाढ होण्याची संकेत जानकारी यांनी व्यक्त केली आहेत, यामागचे काही कारणेही त्यांनी सांगितले आहेत ते आपण सविस्तर खाली पाहू. Kapus rate update 15 january 2024

हे पण वाचा : Kapus Bhav Today 14 January : कापूस भावात तुफान वाढ..! आजचे कापुस बाजार भाव

Kapus Bhav Today 14 January

शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत कापूस बाजार भाव वाढण्याचे संकेत का आहेत हे आपण समजून घेऊ. बरेच सारे शेतकरी मित्र असे आहेत की त्यांना पैशाची टंचाई भासत असल्यामुळे त्यांनी कापूस मिळेल त्या भावात विक्रीवर भर दिला आहे. आणि आपली पैशाची टंचाई दूर केली आहे. काही शेतकरी मित्रांना आपल्या घर खर्चासाठी पैशाची गरज असल्यामुळे अशा शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे.

तर लग्नसराई सुरू झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या मुला मुलींचे लग्न करण्यासाठी पैशाची गरज भासते. ही पैशाची गरज भरून काढण्यासाठी घरात असलेले कपाशी पीक विकण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. अशा काही ना काही कारणांमुळे शेतकऱ्यांनी कापूस विकल्यामुळे शेतकऱ्यांजवळ आता कापूस शिल्लक राहिलेला नाही. Kapus rate update 15 january 2024

आणि यावर्षी कपाशीचे पीक व्यवस्थित न आल्यामुळे उत्पन्नही कमी झालेले आहेत. त्यामुळे एक तर उत्पन्न कमी आणि मागणी जास्त असे चित्र जानेवारीच्या शेवटपर्यंत मार्केटमध्ये निर्माण होणार आहे. आणि ज्या वस्तूची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असतो अशा वस्तूचा भाव कधी पण वाढलेला दिसतो. त्यामुळे कापसाचे बाजार भाव वाढतीलच असे संकेत जाणकारांनी व्यक्त केले आहेत. Kapus rate update 15 january 2024

जर आपणही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आता सध्या विचार केला तर खराब कापसाचा बाजार भाव हा 5000 ते 6000 च्या दरम्यान चालू आहे. आणि सुपर कपाशीचा बाजार भाव हा 6000 ते 7500 पर्यंत चालू आहे. जर कपाशी पिकाचे बाजार भाव वाढले तर ते किमान 10000 हजार पर्यंत जाऊ शकतील तसे अंदाज जाणकारांनी व्यक्त केले आहेत.

पुढे वाचा…

सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit krushibazarbhav