E pik pahani : शेतकऱ्यांच्या पिकांचे वेळोवेळी निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान होत असते. त्या नुकसानीची भरपाई करून देण्यासाठी सरकारने पिक विमा नावाची योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची सुरक्षा दिली जाते. निसर्गाच्या लहरीपणामुळे जर शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले तर भरपाई पोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम सरकार पाठवते. E pik pahani
शिंदे सरकारच्या काळात पिक विमा योजना अंतर्गत लक्षणीय सुधारणा केल्या आहे सरकारने 2023-2024 या अर्थसंकल्पीय चालू वर्षात फक्त एक रुपयात पिक विमा योजना हा कार्यक्रम सुरू केला आहे. याचा अर्थ असा की आता फक्त शेतकरी आपल्या पिकांचा विमा फक्त एक रुपयात घेऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जास्तीत जास्त पिकांचा विमा काढता येतो. E pik pahani
हे पण वाचा : Namo shetakri 2nd installment | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये; यादीत नाव पहा
आणि एक रुपया पिक विमा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकरी हे पीक विमा योजनेत भाग घेतात. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना पिक विमा योजनेअंतर्गत त्यांच्या पिकाची नुकसान भरपाई दिल्या जाते. महाराष्ट्र राज्य सरकार आता शेतकऱ्यांच्या वाटेचे पैसे देणार आहे.
E pik pahani केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25% अग्रीम पिक विमा होणार जमा
20 ऑक्टोबर 2023 पासून खरीप हंगाम सुरू झालेला असून पिकवलेल्या पिकाची 25% आगाव रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे सुरू झाले आहे अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
पिक विमा फक्त एक रुपयात काढता येणार असल्यामुळे हंगामातील हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आणि चालू हंगामात एक 1 कोटी 70 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा खरेदी केलेला आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसानही झाले आहे. त्यामुळे 20 ऑक्टोबर 2023 पासून खरीप हंगामात पिकासाठी 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. E pik pahani
ज्या शेतकऱ्यांनी यशस्वीरित्या E pik pahani केली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25 टक्के अग्रीम पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे काम सध्या जोरावर आहे अशी माहिती सुनील चव्हाण यांनी दिली आहे.