Crop insurance: कृषिमंत्री दादा भुसे यांनी आत्ताच पिक विमा आढावा घेतला, या आढाव्याबद्दल एक सविस्तर बैठकही घेण्यात आली. शेतकऱ्यांना वेळेवर मदत न दिल्याने विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर दादा भुसे यांनी संताप व्यक्त केला.
त्यात या खरीप हंगामात पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा मध्ये सहभाग घेतलेला असून, खराब वातावरणामुळे पिकाचे नुकसान झालेले असून 105 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती. पिक विमा कंपन्यांनी आतापर्यंत 57 कोटी 46 लाख रुपये फक्त वितरित करण्यात आले आहे.
हे पण वाचा : Pm Kisam Encrese Amount | शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये एकाच वेळेस..! पी एम किसान योजनेत मोठा बदल
मात्र राज्यातील बहुतांश कापूस उत्पादक शेतकरी तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळाली नाही. त्यामुळे मंत्र्यांनी पिक विमा कंपन्यांवर नाराजी व्यक्त करून येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांना मदत न दिल्यास पिक विमा कंपन्यांच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच 8 दिवसात शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पिक विमा न दिल्यास पिक विमा कंपन्यांवर योग्य ती कारवाई सुद्धा केली जाईल. कंपन्यांचे लायसनही रद्द करण्याची धमकी यावेळी देण्यात आली. Crop insurance
वास्तविक पाहता पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर कहाणी केली आहे का असा सवाल केला असता कंपन्यांनी योग्य ते उत्तर न दिल्यामुळे मंत्री नाराज झालेले असून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेवर द्यावी, त्यांच्या हक्काची रक्कम वेळेवर न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या करतात, आणि त्याची नाराजी सरकारवर होते. असेही पिक विमा कंपन्यांना बजावून सांगण्यात आले.
मंत्री म्हणाले की अधिकारी योग्य पद्धतीने कामे करत नाही, त्यांना त्यांना सरकारकडून पैसा दिला जातो कंपन्यांची जबाबदारी असते की तो पैसा योग्य लाभार्थ्याच्या खात्यात जमा करायचा मग यासाठी मंत्र्यांची मदत कशाला हवी असा सवाल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना करण्यात आला. येत्या 8 दिवसात योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करावी. अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे असा इशारा त्यांनी दिला.Crop insurance
खरीप हंगामात पिक विमा कंपन्यांचे नुकसान होत असले तरी गेल्या दहा वर्षापासून पिक विमा कंपन्या या नफ्यात आहेत. त्या काळात त्यांचे योगदान काय, याची जर चौकशी केली तर हा हे प्रकरण अजून गुंतागुंतीचे ठरू शकते.Crop insurance
बैठकीत काय निर्णय झाले पहा
- पिक विमा कंपनीत 5.88 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
- बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून 105 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
- आतापर्यंत केवळ 57.46 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
- कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे मदत मिळालेली नाही.
- 8 दिवसात सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावे.
- कर्जमाफी योजनेअंतर्गत अपात्र प्रकरणाचा आढावा द्यावा.
- 2700 हून अधिक शेतकऱ्यांना 30 दिवसात विहीर अनुदान आणि मंजुरी देण्यात यावी.
- पात्र शेतकऱ्यांना पिक विमा मदत आणि कर्जमाफी सारख्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी मंत्र्यांनी निर्धार व्यक्त केला.
अशा विविध उपक्रमांवर बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आलेले असून पिक विमा कंपन्यांनी येथे 8 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विम्याची योग्य ती रक्कम जमा करावी. असे मंत्र्यांनी पिक विमा कंपन्यांना सांगितले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच त्यांच्या हक्काची पिक विम्याची रक्कम जमा होईल.